दैनंदिन आणि आठवडी बाजार ठेक्यावर देण्यास मंजुरी
परंडा दि. १३.
नगरपालिकेची वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न झाली. या वार्षिक सर्वसाधारण सभेत अखेर दैनंदिन आणि आठवडी बाजार ठेक्यावर देण्यास सभागृहात मंजूरी मिळाली मागच्या बैठकीत दैनंदिन भाजी विक्रेत्याचा कर वसूल करण्यासाठी ठेक्यावर देण्याच्या विषयाला विरोध करण्यात आला होता.
काल सर्वसाधारण वार्षिक सभा पार पडली ही सर्वसाधारण सभा नगराध्यक्ष जाकिरभाई सौदागर यांचे अध्यक्षतेखाली पार पडली यावेळी नगर पालिकेच्या मुख्याधिकारी मनिषा वडेपल्ली, न.पा. कार्यालयीन अधिक्षक जगदिश सोंडगे मुनीर जिकरे यांचे सह सत्ताधारी व विरोधी नगरसेवक हजर होते. या बैठकीत विविध विषयावर सविस्तर चर्चा झाली सन २०२६ -२०२७सालासाठी, पाणी पुरवठा, भांडार
विभाग, आरोग्य विभाग, लेखा विभाग, सर्व विभागासाठी साहित्य खरेदी करणे सुविधा पुरविणे व त्याच्या निविदा मंजुर करणे याबाबत ठराव सम्मत झाले. या विषयाचे सुचक अर्थ व नियोजन सभापती रमेशसिंह परदेशी होते तर सत्तार गुलाब खान पठाण यांनी अनुमोदन दिले. विरोधाकांच्या म्हणण्यानुसार बाजार कर नगरपालिका कर्मचाऱ्यांनी करावा असे मत
मांडल्यानंतर नगराध्यक्ष जाकिर भाई सौदागर यांनी नगरपालिकेकडे मनुष्य बळ कमी असल्याने हे काम -योग्य होणार नसून नगरपालिकेचे खूप नुकसान होणार असल्याचे सांगितले सन २०२६ २०२७या अर्थिक वर्षात दैनंदिन विक्रेते व आठवडी बाजार कर वसूलीच्या ठरावावर उपनगराध्यक्ष समरजितसिंह ठाकूर, नगरसेवक रमेशसिंह परदेशी, परविन बासले,
अनिल शिंदे आदिंनी चर्चा केली. व्यापाऱ्यांना जागा मोजून दिली जात नाही व मिळणारा कर जास्त दराने वसुल केल्यांने व्यापाऱ्यांचे नुकसान होते अशीही चर्चा झाली.
नगराध्यक्ष जाकिरभाई यांच्या सूचनेवर अभिप्राय देताना मुख्याधिकारी मनिषा वडेपल्ली यांनी दैनंदिन व आठवडी बाजार कर वसुली ही बाह्य मनुष्यबळ वापरून केल्यास त्याचे नियोजन व त्यावर नियंत्रण करणे शक्य नाही त्यासाठी मनुष्यबळ कमी असल्याने अखेर डेली व आठवडी बाजार ठेक्यावर देण्यासाठी सर्वानुमते मंजूरी मिळाली
सदरील ई-लिलाव शासन संख्येतस्थळावर केला जाईल असे ठरले यास अनुमोदन चंद्रकांत जायकवाड, मन्नाबी मतीन जिनेरी यांनी दिले व अखेर दैनंदिन व बाजार कर वसूली ठेक्यावर देण्याचा ठराव सम्मत झाला. यावेळी सर्व नगरसेवक व कर्मचारी हजर होते.

टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या