: महाराष्ट्र राज्याचे माजी आरोग्य मंत्री तथा भूम-परांडा-वाशी मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार प्रा.डॉ. तानाजी सावंत यांचा वाढदिवस १५ मार्च रोजी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या निमित्ताने संपूर्ण मतदारसंघात विविध सामाजिक उपक्रम राबवण्यात आले असतानाच, पुणे येथे आयोजित विशेष अभिष्टचिंतन सोहळ्यामध्ये परंडा नगरीचे नगराध्यक्ष जाकीर सौदागर यांच्या वतीने आमदार सावंत यांचा शाल, श्रीफळ व पुष्पहार देऊन यथोचित सत्कार करण्यात आला.
या सोहळ्याप्रसंगी जाकीर सौदागर यांचे चिरंजीव वसीम सौदागर, कैफ सौदागर, अबूतला सौदागर, तसेच मुसा कुरेशी आणि गौस शेख यांसह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. मतदारसंघाच्या विकासासाठी अहोरात्र झटणाऱ्या आपल्या नेत्याला शुभेच्छा देण्यासाठी पुणे येथे शिवसैनिकांनी मोठी गर्दी केली होती.

टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या