धाराशिव: जिल्हा परिषद निवडणुकीत भाजपचे पारडे आता पूर्णपणे जड झाले असून ३७ सदस्यांच्या पाठबळाचा दावा करण्यात आला आहे. आमदार तानाजी सावंत यांचे पुतणे धनंजय सावंत यांनी युवा नेते मल्हार पाटील यांची भेट घेतल्याने राजकीय चर्चांना उधाण आले आहे.
लोकसभा निवडणुकीपासून घनिष्ठ मैत्री असलेल्या या दोन युवा नेत्यांच्या भेटीमुळे भाजपचे वर्चस्व सिद्ध झाले आहे. माजी आमदार सुजितसिंह ठाकूर आणि आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या पाठबळामुळे धनंजय सावंतांना जिल्हा परिषदेत उपाध्यक्षपदासारखी मोठी जबाबदारी मिळण्याची शक्यता आहे. या घडामोडींमुळे अर्चना राणाजगजितसिंह पाटील यांचा अध्यक्षपदाचा मार्ग आ
ता पूर्णपणे मोकळा झाला आहे.

टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या